Friday, 25 August 2017

दिनविशेष

[01/06, 1:05 a.m.] Vinod: आजचा दिनविशेष

१ जून १९४८:-

एसटी बसची सुरुवात.... पहिली एसटी बस पुणे-अहमदनगर मार्गावर धावली.

कशी होती पहिली एसटी बस? कोण होते पहिले चालक? कसा होता एसटीचा पहिला प्रवास? खाजगी वाहतुकीचा धोका तेव्हाही होता का?

मुंबईतील सर्वात जुना डेपो कोणता? त्यात कोणत्या डेपोची वाढ झाली? आज एसटीचा कारभार कसा सुरू आहे? कोणत्याही सवलती नसतानाही एसटी मात्र प्रवाशांना वर्षानुवर्षे कशा सोयी पुरवत आहे?

आजकालच्या "फॅशन"नुसार एसटीवर टीका करणे सोपे आहे पण या महामंडळाइतका मोठा कारभार खाजगी वाहतूकदार खरंच करू शकतील का?

"गड्या, आपला लाल डबाच बरा",असं म्हणत किमान एकदातरी एसटी डेपोचा कारभार कसा चालतो हे पहायला तिथे एक फेरफटका मारायला काय हरकत आहे?

http://vinod-gore.blogspot.in/2017/06/blog-post.html?m=1

https://daystrikes.wordpress.com
[01/06, 4:32 p.m.] Vinod: आजचा दिनविशेष

१ जून १९३०:-

संपूर्ण महाराष्ट्राचे आकर्षण असलेली रेल्वे "दख्खनची राणी" अर्थात डेक्कन क्वीन मुंबई-पुणे दरम्यान सुरू झाली.

काय वैशिष्ट्य होते या रेल्वेचे, जेणेकरून या रेल्वेचे अनेकांना अक्षरशः वेड लागले? कोणत्या मार्गाने ही रेल्वे पुण्याचे अंतर कापते आणि किती अंतर कापते?

मुंबई-पुणे प्रवासादरम्यान कित्येक प्रवाशांच्या चांगल्या आठवणी जागवत आजही दख्खनची राणी कशी डौलात मिरवत आहे? कोणाची मैत्री तर कोणाची लग्नेही जुळवणारी ही रेल्वे आजही अत्यंत लोकप्रिय अशीच आहे.

http://vinod-gore.blogspot.in/2017/06/blog-post_1.html?m=1

https://daystrikes.wordpress.com
[02/06, 10:54 a.m.] Vinod: आजचा दिनविशेष

२ जून १९८८:-

बॉलिवूडमधील "शो मॅन" म्हणून ओळखले जाणारे अभिनेते राज कपूर यांचा स्मृतिदिन.

राज कपूर यांचे पूर्ण नाव काय होते? मुंबईतील आर के स्टुडिओ त्यांनी वयाच्या कितव्या वर्षी उभारला?

त्यांचा "मेरा नाम जोकर" चित्रपट पडला तरी कोणत्या चित्रपटाने त्यांना तारले? रशिया, तुर्कीमध्येही कोट्यवधी लोकांनी पाहिला गेलेला राज कपूर यांचा चित्रपट कोणता?

http://vinod-gore.blogspot.in/2017/06/blog-post_2.html?m=1

https://daystrikes.wordpress.com
[03/06, 1:25 a.m.] Vinod: आजचा दिनविशेष

३ जून २०१६:-

"द ग्रेटेस्ट" या टोपण नावाने ओळखले जाणारे जागतिक दर्जाचे महान बॉक्सर महंमद अली यांचे निधन. तीन वेळा हेवी वेट चॅम्पियन होण्याचा मान मिळवणारे बॉक्सर म्हणजे महमंद अली होय.

त्यांचे खरे नाव महंमद अली होते की आणखी वेगळेच? त्यांचे महंमद अली कसे झाले? लहानपणी त्यांची कार चोरीला जाण्याचा आणि बॉक्सिंगचा काय संबंध आहे?

सुरुवातीची लढत कोणाबरोबर जिंकले? अलींची शतकातील सर्वोत्तम लढत म्हणून ते कोणाबरोबर लढले? "रंबल इन द जंगल" लढतीत अलींनी जिंकण्यासाठी कोणता महत्वाचा डावपेच वापरला होता?

त्यांची ताकद कमी झाली हे त्यांना केव्हा समजले? त्यांची शेवटची दुर्दैवी लढत कोणती? ते भारतात केव्हा आले होते?त्यावेळी कोणाला भेटले होते? त्यांना कोणता आजार झाला होता? अमेरिकन सरकारने त्यांच्यावर बंदी का घातली होती? एक माणूस म्हणून महंमद अली कसे लोकप्रिय होते?

http://vinod-gore.blogspot.in/2017/06/blog-post_3.html?m=1

https://daystrikes.wordpress.com
[04/06, 8:23 a.m.] Vinod: आजचा दिनविशेष

४ जून १९९४:-

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ब्रायन लाराची ८ डावात ७ शतके, पण त्यादिवशी लारा फक्त शतकाच्या हेतूने खेळत नव्हता. वेगळाच पराक्रम त्याच्या हातून पुढे घडणार होता, कोणता पराक्रम होता तो जो आजही कोणीही मोडू शकले नाही?

एका भयानक तुफानाची ही सुरुवात होती.  होय, फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये नाबाद ५०१ धावा.... केवळ अवर्णनीय..... आजही हा विक्रम अबाधित आहे. हे वादळ ५०१* धावांपर्यंत जाऊन थांबले.

http://vinod-gore.blogspot.in/2017/06/blog-post_4.html?m=1

https://daystrikes.wordpress.com
[05/06, 10:12 a.m.] Vinod: आजचा दिनविशेष

५ जून १९७०:-

शिवसेना-कम्युनिस्ट संघर्षातील पहिली ठिणगी - कम्युनिस्ट नेते कॉम्रेड कृष्णा देसाई यांची हत्या. मुंबईतील कम्युनिस्टांचे वाढते प्रस्थ मोडून काढण्यासाठी शिवसेनेशी वारंवार खटके उडू लागले.

नागपुरातही बाळासाहेबांवर कम्युनिस्टांकडून जीवघेणे हल्ले झाले होते. नागपुरात अवघ्या चार शिवसैनिकांनी दहा कम्युनिस्ट गुंडांना चोपून काढले आणि बाळासाहेबांना वाचवले, नक्की काय घडले होते त्यावेळी?

कृष्णा देसाई यांच्या हत्येत सेनेला कसे गोवले? त्यातून शिवसेना सहीसलामत कशी बाहेर पडली? या हत्येमुळे रिक्त झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेतर्फे कोण लढले? शिवसेनेचा पहिला आमदार होण्याचा मान कोणाला मिळाला?

http://vinod-gore.blogspot.in/2017/06/blog-post_5.html?m=1

https://daystrikes.wordpress.com
[06/06, 9:03 a.m.] Vinod: आजचा दिनविशेष

६ जून १९८४:-

सुवर्ण मंदिरात घुसलेल्या दहशवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी  राबवण्यात आलेले ऑपरेशन 'ब्लू स्टार' समाप्त.

पाकिस्तानची मदत घेऊन स्वतंत्र खलिस्तान निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेले जर्नलसिंग भिंद्रनवाले आणि त्यांच्या साथीदारांचा काय प्लॅन होता? खरंच तसं झालं असत तर भारताचा नकाशा कसा झाला असता?

त्यांचा बिमोड कसा करण्यात आला? कशी तयारी करण्यात आली होती? या ऑपरेशनचे इंदिरा गांधींवर काय परिणाम झाले?

http://vinod-gore.blogspot.in/2017/06/blog-post_6.html?m=1

https://daystrikes.wordpress.com
[07/06, 12:52 p.m.] Vinod: आजचा दिनविशेष

७ जून १९७५:-

पहिल्यावहिल्या क्रिकेट विश्वचषकास क्रिकेटची पंढरी लॉर्ड्स येथे सुरुवात. पहिलाच सामना भारत आणि इंग्लंडदरम्यान खेळवण्यात आला.

इंग्लंडने ३०० हुन अधिक धावा केल्या असताना भारताचे "चोख" प्रत्युत्तर कसे होते? सामन्यातील सर्व षटके खेळून सुनील गावस्कर यांनी किती धावा केल्या होत्या? 😀

या विश्वचषकात किती षटकांचे सामने होते? कोणते संघ सामील झाले होते? यातील आज कोणते संघ अस्तित्वात नाहीत? चेंडूचा रंग, खेळाडूंचे कपडे आजच्यासारखे होते का?

कोणत्या खेळाडूंनी हा विश्वचषक गाजवला? कोणी जिंकला हा विश्वचषक? यात भारताची कामगिरी कशी होती?

http://vinod-gore.blogspot.in/2017/06/blog-post_7.html?m=1

https://daystrikes.wordpress.com
[08/06, 1:07 p.m.] Vinod: आजचा दिनविशेष

८ जून १९३६:-

"भारतीय नागरी नभोवाणी"चे "ऑल इंडिया रेडिओ" अर्थात "आकाशवाणी" असे नामकरण.

कशी होती आकाशवाणीची नवी सुरुवात? "भाईयो और बहनो" म्हणत बिनाका गितमाला सादर करणाऱ्या अमीन सायांनींचा जादुई आवाज आठवतोय का?

हवामहल, सितारो की मेहफिल हे रेडिओवरील जुने कार्यक्रम आठवतात का? वनिता मंडळ, कामगारसभा, अहो प्रपंच हे मराठी कार्यक्रम कितीजणाच्या लक्षात आहेत? रेडिओचे जुने मॉडेल, त्यावरील क्रिकेट कॉमेंटरी......

चला तर, उजाळा देऊ या आठवणींना....

http://vinod-gore.blogspot.in/2017/06/blog-post_8.html?m=1

https://daystrikes.wordpress.com
[09/06, 9:30 a.m.] Vinod: आजचा दिनविशेष

९ जून १९३४:-

जगप्रसिद्ध कार्टून डोनाल्ड डकचा जन्मदिन. आजच्या दिवशी डोनाल्ड डक हे कार्टून सर्वप्रथम पडद्यावर अवतरले.

या बदक मित्राने गेली कित्येक वर्षे आपल्याला हसवले आहे, आपलं बालपण खऱ्या अर्थाने हसवत ठेवलं होतं. जेव्हा डोनाल्ड डक आणि मिकी माउस यांची जोडी जमली तेव्हा यांनी लोकप्रियतेचे अनेक विक्रम मोडले.

http://vinod-gore.blogspot.in/2017/06/blog-post_9.html?m=1
[09/06, 5:10 p.m.] Vinod: आजचा दिनविशेष

९ जून १९८३ :-

१९८३च्या क्रिकेट विश्वचषकातील पहिला धक्कादायक विजय. बलाढ्य ऑस्ट्रेलियावर काहीशा दुबळ्या झिम्बाव्वेचा १३ धावांनी विजय. क्रिकेट वर्ल्डकपच्या इतिहासात हा पहिला धक्कादायक विजय म्हणता येईल.

नॉटिंगहॅम येथे झालेल्या १९८३च्या साखळी सामन्यात झिम्बाव्वेने पहिल्यांदा फलंदाजी करताना ६० षटकांत ६ बाद २३९ धावा केल्या होत्या. सहाव्या क्रमांकावर आलेल्या झिम्बाव्वेच्या फ्लेचरने शानदार खेळ करत ६९* धावा केल्या होत्या. त्याला तळाच्या फलंदाजांनी चांगली साथ दिली होती. झिम्बाव्वेच्या या लक्ष्याचा पाठलाग करताना केप्लर वेसेल्स(जो मूळचा दक्षिण आफ्रिकन असूनही ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांकडून खेळला आहे),अॅलन बॉर्डरसारखे दिग्गज खेळाडू असताना ऑस्टेलियाचा डाव २२६ धावांत गुंडाळला गेला. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर केप्लर वेसेल्स (७६) आणि सातव्या क्रमांकावर खेळण्यास आलेला रॉड मार्श (५०) यांनी सर्वाधिक धावा केल्या होत्या.  फ्लेचरने अष्टपैलू कामगिरी करत चार विकेटही घेतल्या होत्या. या विजयाने झिम्बाव्वे या लिंबूटिंबू टीमने दिग्गज असलेल्या ऑस्ट्रेलियाला नमवून धक्कादायक विजयांचा पाया रचला तर त्याच वर्ल्डकप स्पर्धेत लिंबूटिंबु समजल्या गेलेल्या भारताने वेस्ट इंडिजला फायनलमध्ये हरवून कळस चढविला.
[09/06, 6:40 p.m.] Vinod: जिहादचे उदात्तीकरण आणि 'उपयुक्त मूर्ख'

इंग्रजीमध्ये 'युजफूल इडियट' म्हणजे 'उपयुक्त मूर्ख' नावाची एक संज्ञा आहे. असं म्हणतात की ह्या संज्ञेचा प्रयोग सर्वप्रथम लेनिनने केला. रशियामधल्या रक्तलांछित डाव्या क्रांतीचे आंधळे समर्थन करणाऱ्या पश्चिमेतल्या काही लेखकांना उद्देशून लेनिनने हे उद्गार काढले होते असं म्हणतात. ज्या ज्या वेळी जगात आपल्या तत्वज्ञानाचा हिंसक मार्गाने प्रसार करणाऱ्या चळवळी प्रबळ होतात त्या त्या वेळी त्या हिंसेचे 'मानवतावादी दृष्टिकोनातून' लंगडे समर्थन करण्यासाठी काही लोक पुढे सरसावतात. त्या लोकांसाठी 'उपयुक्त मूर्ख' ही संज्ञा वापरली जाते. हे उपयुक्त मूर्ख सहसा डाव्या विचारांशी बांधिलकी असणारे, वरकरणी स्वतःला 'उदारमतवादी' म्हणवणारे पण प्रत्यक्षात स्वतःच्या नेभळटपणाला तत्वांचा मुलामा देणारे स्वार्थी लोक असतात. 

 

इस्लामी दहशतवाद ही आज जगापुढे आ वासून उभी असलेली सगळ्यात मोठी समस्या आहे. जगात कुठेही इस्लामी दहशतवादाच्या घटना घडल्या की त्या घटनांचे मानवतावादी दृष्टिकोनातून समर्थन करणारी उपयुक्त मूर्खांची प्रचंड फौज सध्या जगभरातल्या पारंपरिक प्रसार माध्यमांमधून काम करते आहे. ह्या फौजेचे काम एकच आहे, जगात कुठेही दहशतवादी हल्ला झाला की तो हल्ला करणाऱ्या नराधमांचे छुपे उदात्तीकरण करणे आणि जो हल्ला झाला तो दहशतवाद्यांच्या नजरेतून पूर्णपणे न्याय्य कसा होता हे लोकांना पटवून देणे. दहशतवाद्यांचे उदात्तीकरण हे एकमेव काम असणारा एक खूप मोठा गट मीडिया आणि एकेडेमिया मधून सध्या जगभरात सक्रिय आहे आणि इस्लामी जिहादी आपल्या प्रोपागंडासाठी ह्या गटातल्या लोकांचा सोयीस्करपणे वापर करून घेत आहेत. मग मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले त्याला कारण राममंदिराचा मुद्दा, अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरवर जे दहशतवादी हल्ले झाले त्याला अमेरिकेचे मध्यपूर्वेतले परराष्ट्रीय धोरण जबाबदार होते. फ्रांसमध्ये जे दहशतवादी हल्ले झाले त्याला दहशतवाद्यांची गरिबी आणि फ्रान्सच्या समाजातली आर्थिक असमानता जबाबदार होती असा अपप्रचार जाणून बुजून मीडियामधून केला जातो. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की काही प्रसिद्ध लेखकही ह्या उपयुक्त मूर्खांच्या मोर्चात सामील आहेत. अगदी होसे सारामागो आणि दारीयो फो सारख्या नोबेल  पारितोषिकप्राप्त लेखकांचाही ह्यात समावेश आहे.   

इस्लामी दहशतवाद आता असंघटित स्वरूपात जगापुढे येतोय. वेगवेगळ्या देशात 'लोन वुल्फ' म्हणजे एकेकटे दहशतवादी ट्रक, सुरे, सहज उपलब्ध होणारी स्फोटके वगैरे नित्य वापरातल्या गोष्टी शस्त्रासारख्या वापरून सॉफ्ट टार्गेटस म्हणजे सहज लक्ष्य करता येण्यासारख्या सामान्य लोकांवर हल्ले करत आहेत. अर्थात ह्या सगळ्या हल्ल्यांमागची विचारधारा एकच आहे, ती म्हणजे कडवा इस्लामी कट्टरतावाद. पण ह्या दहशतवाद्यांचे उदात्तीकरण करणारे लोक इस्लामी कट्टरतावादाबद्दल कधीच बोलत नाहीत. त्यांचा भर असतो दहशतवाद्यांची 'मानवी बाजू' दाखवण्याकडे. मग १९९३ मधल्या मुंबई बॉम्बहल्ल्यांबद्दल फाशी गेलेला याकूब मेमन 'मृदूभाषी आणि खूप पुस्तके वाचणारा' कसा होता अश्या मथळ्याचे लेख प्रसिद्ध होतात. २६ नोव्हेंबरच्या मुंबईवरच्या भयानक दहशतवादी हल्ल्यांमध्ये जिवंत हाती लागलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब, ज्याने अत्यंत थंड रक्ताने निरपराध, निःशस्त्र भारतीयांवर गोळ्या चालवल्या होत्या, तो लहानपणी कसा गोंडस होता. त्याला हिंदी सिनेमे बघायला कसे आवडायचे. त्याच्या बालपणीच्या आत्यंतिक गरिबीमुळे त्याला 'बडा आदमी' कसं बनायचं होतं आणि त्यामुळे तो सहजपणे दहशतवाद्यांच्या गळाला कसा लागला ह्याच्या काळीज पिळवटणाऱ्या कहाण्या भारतीय वृत्तपत्रातून प्रसिद्ध होतात. 

सध्या काश्मीरच्या खोऱ्यात इस्लामी कट्टरतावाद हातपाय पसरतोय. हिजबुल मुजाहिदीन आणि लष्करे तोयबाचे दहशतवादी इस्लामी खिलाफतसाठी लढत आहेत. तथाकथित काश्मिरीयतशी त्यांचे काहीच देणेघेणे नाही ह्याचे अनेक पुरावे हाती लागूनसुद्धा त्या दहशतवाद्यांचे उदात्तीकरण करण्यासाठी भारतीय मीडियामधले काही पंचमस्तंभी पत्रकार हिरीरीने पुढे होत आहेत. मग भारतीय लष्कराने मारलेला लष्करचा कमांडर, खतरनाक दहशतवादी आणि खुनी बुऱ्हान वणी हा 'गरीब हेडमास्तरचा मुलगा' होतो तर त्याचा उत्तराधिकारी, हल्लीच मारला गेलेला सबझार बट हा प्रेमात अयशस्वी झाल्यामुळे निराश होऊन दहशतवादाकडे कसा वळला ह्याचे गोडवे गेले जातात. काश्मीरमध्ये गरिबी आणि बेकारी आहे म्हणून तिथले तरुण दहशतवादाकडे वळलेत हा युक्तिवाद तर कित्येक वर्षे केला जातोय. देशात इतरही प्रांतात गरिबी आहे, बेकारी आहे, इतर प्रश्न आहेत, तरीही तिथले तरुण कसे हिंसेकडे वळत नाहीत हा प्रश्न मात्र कुणालाही विचारावासा वाटत नाही. एप्रिलमध्ये मेजर लिथुल गोगोई ह्यांनी जीपला बांधून ह्या दगडफेक्याला फिरवलं तो फारुख दार शालीवर सुंदर भरतकाम कसे करतो ह्याचेच कौतुक, पण एकही गोळी न झाडता कामगिरी फत्ते करणाऱ्या मेजर गोगोईचे रास्त कौतुक करणारे भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल बिपीन रावत ह्यांची तुलना मात्र थेट जालियाँवाला बाग मध्ये हजारो निःशस्त्र लोकांवर गोळ्या झाडण्याचा आदेश देणाऱ्या क्रूरकर्मा , ब्रिटिश जनरल डायरबरोबर केली जाते ती ही भारतीय पत्रकारांकडून ह्याहून मोठे दुर्दैव ते काय?  

 

गेल्या आठवड्यात लंडनमध्ये दहशतवादी हल्ले झाले. गेल्या तीन महिन्यातला हा तिसरा मोठा इस्लामी दहशतवादी हल्ला. इस्लामी दहशतवाद लंडनसारख्या ठिकाणी का फोफावतोय ह्याची कारणे शोधण्याचे सोडून तिथल्या मीडियामधले काही लोक हा हल्ला करणारा दहशतवादी तो १२ वर्षांचा असताना त्याचे वडील गेल्यामुळे सैरभैर होऊन दहशतवादाकडे कसा वळला ह्याच्या रसभरीत कहाण्या लिहीत आहेत. जगात दरवर्षी लाखो मुलांचे वडील अकाली मरण पावतात. बहुसंख्य मुले ते दुःख पचवतात करत, जबाबदार बनतात आणि आपले आयुष्य घडवतात. प्रेमभंगही जगात अनेकांचे होतात, नैराश्यही खूप लोकांना येतं पण म्हणून काही ते दहशतवादाकडे वळत नाहीत. इस्लामी दहशतवाद हा धार्मिक कट्टरतेतून आलेला आहे आणि त्या मूळ कारणाकडे दुर्लक्ष करून जर मीडिया दहशतवाद्यांचे उदात्तीकरण आणि मानवीकरण करत राहिला तर काही दिवसांनी मला खूप डास चावले म्हणून मी दहशतवादाकडे वळलो असाही एखाद्या दहशतवाद्याचा भावनेने पिळवटलेला कबुलीजबाब आपल्याला मीडियामध्ये वाचायला मिळू शकेल. 

दहशतवाद्यांचे हे उदात्तीकरण ही एक जाणून बुजून खेळलेली खेळी आहे. ह्यामधून तीन गोष्टी साध्य होतात, एक म्हणजे दहशतवादाचे जे मूळ आहे, ते म्हणजे इस्लामी कट्टरतावाद त्याच्यावर पांघरूण घातले जाते. दहशतवादी हल्ल्यात जी निरपराध माणसे मारली जातात, जी कुटुंबे त्यांचा दोष नसताना कायमची उध्वस्त होतात त्यांच्या कहाण्या आपोआपच विस्मरणात जातात आणि मृतांच्या संख्येचा आकडा एवढ्यापुरतीच त्यांची ओळख जनमानसात उरते. पण दहशतवादी कृत्ये करणारे जे नराधम असतात ज्यांनी एका विचारप्रणालीच्या आधारे अत्यंत थंड डोक्याने ही कृत्ये केलेली असतात, त्यांचे मात्र मानवीकरण होते. त्यांच्य कृत्यांना भावनांचा मुलामा देऊन त्यांची तीव्र क्रूरता जाणीवपूर्वक लोकांच्या नजरेआड केली जाते. हे महान कार्य 'उपयुक्त मूर्ख' स्वखुशीने करतात. कधी भीतीपोटी, कधी अज्ञानापोटी तर कधी आंधळ्या स्वार्थापायी उपयुक्त मूर्ख दुष्टांची तळी उचलत राहतात पण त्यांची उपयुक्तता संपली की सगळ्यात पहिला बळी त्यांचाच जाणार असतो हे सनातन सत्य मात्र त्यांना कधीही उमगत नाही. 

 

- शेफाली वैद्य

http://m.dailyhunt.in/news/india/marathi/tarun+bharat+mumbai-epaper-tbmumbai/jihadache+udattikaran+aani+upayukt+murkh-newsid-68651857
[12/06, 10:23 a.m.] Vinod: आजचा दिनविशेष

१२ जून ४७६:-

महान भारतीय गणिती, खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट जन्मदिन. इतर अनेक वैज्ञानिक, गणिती, महापुरुषांचा जन्मदिन गणित करून,संदर्भ घेऊन काढावा लागतो,मात्र आर्यभट्टाने स्वतःच्या जन्माबद्दल स्वतःच लेखन केले आहे, त्याबद्दल तो काय म्हणतो?

गणितातील π ची किंमत पाचव्या शतकातच आर्यभट्टाने शोधून ठेवली होती, त्याबद्दल आर्यभट्टाने लिहिलेला संस्कृत श्लोक कोणता?

वर्तुळ आणि त्रिकोणाच्या क्षेत्रफळाबद्दल आर्यभट्टाने सुंदर श्लोक लिहिला आहे, काय अर्थ होतो त्याचा? आजच्या सुत्रांशी आर्यभट्टाची सूत्रे जुळतात का?

शून्याचा शोध आणि वापर,गणित, भूमिती,खगोलशास्त्र, त्रिकोणमिती अशा कित्येक शास्त्रात फक्त १२१ श्लोक लिहून क्रांती करणारा विद्वान म्हणजे भारताचा अभिमान असलेला हा आर्यभट्ट....

या आर्यभट्टाच्या संस्कृत श्लोकांचे मराठी भाषांतर वाचून आपणही चकित व्हाल.

http://vinod-gore.blogspot.in/2017/06/blog-post_27.html?m=1

https://daystrikes.wordpress.com
[13/06, 3:12 p.m.] Vinod: आजचा दिनविशेष

१३ जून १८३१:-

क्लासिकल फिजिक्सची धुरा सांभाळणारा न्यूटनच्या तोडीचा शास्त्रज्ञ जेम्स क्लर्क मॅक्सवेल जन्मदिन.

भौतिकशास्त्रात मॅक्सवेलची समीकरणे क्रांती करणारी ठरली, त्यांचा अर्थ समजणे बहुधा सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर होता पण त्या समिकरणांची लोकप्रियता इतकी प्रचंड होती की, फॅशन म्हणून लोकांच्या टी शर्टवर ती समीकरणे छापून अभिमानाने लोक मिरवत होते.

त्याची आणि तो यात एक विलक्षण आणि गंभीर असे साम्य आहे, कोणते आहे ते? त्याने शोधलेल्या एका थियरीबद्दल शेजारच्यांच्या चपला, बुटांचा प्रसाद मिळाला होता, ती त्याची कोणती "थियरी" होती?

http://vinod-gore.blogspot.in/2017/06/blog-post_13.html?m=1

https://daystrikes.wordpress.com