मर्दा चल उठ जागा हो तू राजा शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात जन्माला आलेला आहेस
आरे परिस्थितीत रडण्यापेक्षा परिस्थितीशी लढण्यात मजा आहे .
व्यसनात झिंगण्यापेक्षा बलाढ्य होण्यात मजा आहे . स्वार्थ मिरावण्यापेक्षा परमार्थ करण्यात मजा आहे.
मर्दा चल उठ जागा हो तू शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात स्वराज्यात जन्माला आलेला आहेस.
अस्तित्व शून्य करून जगण्यापेक्षा नाव करून मारण्यात मजा आहे .
फक्त घेण्या पेक्षा दुसऱ्याला काहीतरी चांगलं देण्यात मजा आहे
मर्दा चल उठ जागा हो तू शिवछत्रपतींच्या स्वराज्यात महाराष्ट्रात जन्माला आला आहेस
आरे अश्रू ढाळण्यापेक्षा दुसर्याचे अश्रू पुसण्यात मजा आहे
भ्रष्टाचार करण्यापेक्षा मेहनतीने कमावलेल्या पैशात मजा आहे
श्रीमंतांची खळगी भरण्यापेक्षा गरिबांची ओंझळ भरण्यात मजा आहे
मर्दा चल उठ जागा हो तू शिवछत्रपतींच्या स्वराज्यात महाराष्ट्रात जन्माला आला आहेस
मंदिरी खोटा भाव मिरविण्यापेक्षा आई वडिलांची सेवा करण्यात मजा आहे
नेहमीच फुलांवरून चालण्या यापेक्षा कधीतरी काट्यानंवरून चालण्यात मजा आहे
या देशातल्या स्त्रियांवर अन्याय अत्याचार करण्यापेक्षा तिचा सन्मान करण्यात मजा आहे.
मर्दा चल उठ जागा हो तू माँ साहेब जिजाऊ ,शिवछत्रपती, शंभूराजे, यांच्या स्वराज्यात जन्माला आलेला आहेस
मर्दा बघ हा सह्याद्री , हे गडकोट तुला आवाज देतायत चल उठ एकसंघ हो हे जातीपातीच राजकारण सोड आणि शिवरायांच्या या नावाखाली एकत्र ये बघ म आपल्या आईबहिनी ताठ मानेने जगतील आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने माझ्या शिवरायांनी निर्माण केलेला हा स्वराज्य अबाधित राहील
मर्दा चल उठ जागा हो तू शिवछत्रपतींच्या स्वराज्यात महाराष्ट्रात जन्माला आला आहेस.
आरे आपण दिवाळी ,दसरा ,पाडवा यांसारखे सर्व सण साजरे करतो घरात मंदिरात न चुकता पूजा करतो त्याला नवस बोलतो आरे पण ज्या माझ्या राज्यामुळं हे सर्व देव आपल्या मंदिरात आहेत आणि आपण सर्व हे सण साजरे करतोय तेही माझ्या या राजांमुळेच करतोय
आरे मर्दा तुला हे सर्व माहीत आहे की आपल्या आया बहिणी आज खुल्या मानेन चालतायत राहतायत ते ही माझ्या राज्यामुळं आणि मी माझ्या राजाच कर्तृत्व विसरत चाललोय त्यांचं अस्तित्व विसरत चाललोय यासाठीच स्वराज्य निर्माण केलं का
आहो स्वराज्य निर्माण करताना स्वताच नाव देखील या राजांन कोरल नाही किंवा या महाराष्ट्राला किंवा स्वराज्याला शिवराष्ट्र असेही नाव दिल नाही ओ रयतेच स्वराज्य तेही आपल्याच रयतेच्या नावाने करून टाकलं तरीही आजून आपले डोळे उघडत नाहीत की आपण एकसंघ व्हावं संभाजींचं बलिदान आपल्या नजरेसमोर हवं एवढे अंगाचे तुकडे तुकडे केले तरी मान झुकवली नाही आणि आज आपण जातीपातीचे राजकारण करून आपणच आपलीच डोकी फोडतोय आणि गनिमी आपला खेळ बघतोय आरे केव्हा जागा होणार माणसा. आरे मर्दानो उठा जागे व्हा आणि दाखवून द्या या स्वराज्यावर संकट आणणार्या शत्रूंना ,गनिमिना आजून ही बोथट झाली नाही तलवार या शिवरायांच्या मावळ्यांची. 🚩🚩जय शिवराय🚩🚩