Thursday, 1 August 2019

सैनिक हो तुमच्यासाठी

ज्याप्रमाणे आपण मातृ ऋण, पितृ ऋण कधी फेडू शकत नाही तसेच माझ्या या भारतीय सैनिकांनी दिलेल्या बलिदानाचे ऋण सहजासहजी फिटणारे नाही . माझ्या या बांधवांकरिता मी एक   संग्रहित केलेली कविता सादर करते

नाही स्वतःची चिंता 
उभे सैनिक सीमेवर।।
देशाचे रक्षण करत
झेलीत गोळ्या छातीवर।।१।।

आहात तुम्ही म्हणून
जगतो आम्ही आरामात।।
चिंता करता देशाची
न गुरफटता नात्यात।।२।।

नाही जुमानत कधी
ऊन पाऊस वारा। 
तुमच्यामुळेच आहे आज
सुरक्षित भारत सारा।।३।।

No comments:

Post a Comment