Friday, 24 March 2017

चला संस्कृत शिकूया

आपला सांस्कृतिक वारसा आपणच जतन करायचा आणि पुढील पिढीलाही द्यायचा. त्यासाठी हा एक नम्र उपक्रम.

चला, संस्कृत शिकूं या ! –
         पाठ १ 

कांहीं शब्दांची ओळख – शब्दसंग्रह १

अ. क्र.

मराठी

संस्कृत

1

तूं

त्वम्

2

एव

3

तूंच

त्वमेव

4

आई

माता

5

आणि

6

वडील

पिता

7

भाऊ

बन्धुः

8

मित्र, सखा

सखा

9

विद्या

विद्या

10

धन, द्रव्य

द्रविणं

11

सर्व, सर्वकांहीं

सर्वं

12

माझा, माझी, माझें

मम

13

देवा, हे देवा

देव

अभ्यास १
वरील शब्दसंग्रह वापरून खालील पदें तयार करा. “मराठी” ह्या रकान्यात ज्या क्रमाने शब्द दिले आहेत, त्यांचे संस्कृत शब्द त्याच क्रमाने “संस्कृत” या रकान्यात लिहायचे, इतकंच.  –

अ. क्र.

मराठी

संस्कृत

1

तूंच, आई, आणि, वडील, तूंच

___ ____ ___  ____ ____

2

तूंच, भाऊ, आणि,  तूंच, सखा

__  ____ ___  ___ _____

3

तूंच, विद्या, आणि, धन, तूंच

____ ____  ____ ___  ___

4

तूंच, सर्वकांही, माझें, देवा, हे देवा

____ ______  ___ ___ ____

पहा बरं, आपल्या सर्वांच्या परिचयाची एक प्रार्थना तयार झाली ना !
आणि प्रार्थनेचा अर्थही समजला ना ? हवं तर, मराठीत तो कसा लिहिला जाईल तसा पुन्हा लिहून टाकावा.

ज्याना ही प्रार्थना पाठ आहे, त्यांना एक फरक जाणवेल. तो म्हणजे, वर तिस-या ओळीत बनतंय् “बन्धुः च”.
परिपाठ मात्र आहे, “बन्धुश्च”
एवढ्यानं गोंधळायला होऊं नये.
“बन्धुः + च” मिळून “बन्धुश्च” हा संधि झाला आहे, इतकंच. आणि तें छानच आहे.

प्रत्येक ओळीच्या शेवटी एक उभी रेघ (।) काढायची. ती रेघ म्हणजे संस्कृतमधला पूर्णविराम आहे. किंवा काव्यातल्या ओळीच्या शेवटीसुद्धा अशी रेघ वापरली जातेच. आणि कडव्याच्या शेवटी दोन उभ्या रेघा (॥).

एकूण प्रार्थना अशी होते.

त्वमेव माता च पिता त्वमेव ।

त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव ।

त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।

त्वमेव सर्वं मम देव देव ॥

ज्याना माहीत नव्हती, किंवा ज्यांची पाठ नाही, त्यांनी पाठ करून टाकावी. चांगली प्रार्थना आहे.

कुणाच्या जाति, धर्म, पंथ अशा कुठल्याच भावनांशी विसंगत असण्याचाही प्रश्न नाहीय्ये.

पाठ केली, कीं संस्कृत शिकायला सुरवात केली, म्हणजे काय केली, तें नुसतं म्हणून दाखवून नव्हे, तर अर्थ पण सांगतां येईल, ना ?

शुभमस्तु (शुभम् + अस्तु) ।

मंगलमय, कल्याणकारी

शुभम्

असूं दे, होवो

अस्तु

No comments:

Post a Comment